Thursday, 28 July 2016

पाऊस जेंव्हा बाहेर पडत असतो

पाऊस जेंव्हा बाहेर पडत असतो
तो  मात्र तिच्या  आठवणीत बुडत असतो,
त्याच्या  मनात कवितांच्या सरी रिमझिम रिमझिम नाचत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात

बराच वेळ बेधुंद पणे गेल्यानंतर त्याला कळतं
की तो स्वतःला विसरलाय,
त्याच्या  स्वप्नातल जग तर आपण केंव्हाच हरवलाय.
नकळत त्याच्या  डोळ्यात अश्रू येत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात

अशावेळी तो  उगाचच बावरतो,
कोसळणारा पाऊस आणि ढगांचा गडगडाट त्याला  सावरतो.
ओंघळणारे आसवे त्याची  स्वप्न पुसत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात.

सागर नाईकडे

1 comment: