Wednesday, 11 January 2017

तू असशील

तू असशील
खोल हृदयाच्या पुन्हा कधीच न उघडलेल्या कप्प्यात
अन मृगजळाच्याही पलीकडे न पोहचणाऱ्या नजरेच्या टप्प्यात

तू असशील
मावळणाऱ्या सूर्याला निरोप देणाऱ्या किनाऱ्यापाशी
अन माझ्या  उधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी

तू असशील
मनातल्या मनातच मला साद देणाऱ्या हर एक स्पन्दनाच्या आरोळीत

तू असशील
एकांतात.... अन गर्दीतही
नाराजीत .... अन मर्जीतही
पावसाच्या  पहिल्या थेंबात
आरशामधल्या प्रतिबिंबात
स्वप्नात अन कल्पनेत
सर्व काही व्यापलेल्या आठवणींच्या दुनियेत....!!!

सागर नाईकडे

Thursday, 28 July 2016

पाऊस जेंव्हा बाहेर पडत असतो

पाऊस जेंव्हा बाहेर पडत असतो
तो  मात्र तिच्या  आठवणीत बुडत असतो,
त्याच्या  मनात कवितांच्या सरी रिमझिम रिमझिम नाचत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात

बराच वेळ बेधुंद पणे गेल्यानंतर त्याला कळतं
की तो स्वतःला विसरलाय,
त्याच्या  स्वप्नातल जग तर आपण केंव्हाच हरवलाय.
नकळत त्याच्या  डोळ्यात अश्रू येत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात

अशावेळी तो  उगाचच बावरतो,
कोसळणारा पाऊस आणि ढगांचा गडगडाट त्याला  सावरतो.
ओंघळणारे आसवे त्याची  स्वप्न पुसत असतात...
आणि सगळे त्याला  वेडा समजत असतात.

सागर नाईकडे

Tuesday, 28 June 2016

पाऊस आणि तू

पाऊस फसवा तुझ्यासारखाच... अन जरासा लहरीही
न बरसता निघोनि जाइ... देउन जखम गहरी ही

चातकाची तहान माझी आसूसलेली एक थेंबास
सरींच्या धारांतूनि शोधण्या तुझ्या पुसटश्या प्रतिबिंबास

माझ्यासवे वाट पाहती साऱ्या दिनाच्या प्रहरीही
पाऊस फसवा तुझ्यासारखाच... अन जरासा लहरीही

धडधड हृदयाची माझ्या गडगडाटात लुप्त झाली
वीज होऊनि तू लखलखता  स्पंदने सारी तृप्त झाली

स्पंदनांचीही गति थांबवी नजर अशी तव जहरी ही
पाऊस फसवा तुझ्यासारखाच... अन जरासा लहरीही

सागर नाईकडे

Sunday, 11 October 2015

स्वप्नात येवून जा

पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा ,
स्वप्नांची मेहफ़िल सजवून जा .
रुसवे फुगवे श्वासांची घुसमट थाम्बवुन जा
शब्दांची बरसात करुन जा
वेळेच्या रिकाम्या जागेवर हळूच फुंकर मारुन जा
हुरहुर मनातली मिटवून जा
पुन्हा एकदा मनाला धुंदी देऊन जा
माझे मी पण तुझे तू पण विसरून  जा
 पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा


मनाच्या या पडद्यावर तुजी छबि पुन्हा एकदा उमटवून जा
विस्कटलेल्या या मनाला सावर्न्याची  उमेद देऊन जा
आठवनिंच्या या फुलांना नविन सुगंध देऊन जा
मनाच्या या चातकाचा पाउस तू बनुनी जा
अंधारलेल्या या मनाचा कडवसा तू होउन जा
जीवनाच्या या वाटांना वळन नवे तू देऊन जा
 पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा

पावसाच्या या थेम्बाला मोती तू बनवून जा
त्राणहिन या शरीराचा श्वास नवा तू होउन जा

सागर नाईकडे & धनंजय माने